सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

वन्यजीव सप्ताहानिमित्त तुर्केवाडी आयटीआयमध्ये निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न

Admin Sarthi Maharashtracha

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

वन्यजीव सप्ताहानिमित्त तुर्केवाडी आयटीआयमध्ये निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
“

वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी ‘निसर्ग व मानवी जीवन’ या विषयावर सखोल विचार मांडले.

चंदगड / प्रतिनिधी: गोपाळ गडकरी,

सामाजिक वनीकरण विभाग चंदगड यांच्या वतीने वन्यजीव सप्ताह २०२६ च्या पहिल्या दिवशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तुर्केवाडी (स्थित हलकर्णी) येथे विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

​कार्यक्रमादरम्यान पहिल्या तीन क्रमांकांच्या यशस्वी विजेत्यांना वनक्षेत्रपाल दत्ता पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी ‘निसर्ग व मानवी जीवन’ या विषयावर सखोल विचार मांडले. मानवाचे अस्तित्व निसर्गावरच अवलंबून असून वन्यजीव व पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे, असा संदेश त्यांनी दिला.

​या कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल माणिक खोत, वनरक्षक अरुण सांगळे, जालिंदर गावडे आणि वनसेवक रवी पाटील यांच्यासह आयटीआयचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Admin Sarthi Maharashtracha

Admin Sarthi Maharashtracha

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीनिमित्त आजरा शैक्षणिक संकुलात भव्य स्वच्छता अभियान
शैक्षणिक

अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीनिमित्त आजरा शैक्षणिक संकुलात भव्य स्वच्छता अभियान

रोझरी विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
शैक्षणिक

रोझरी विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

व्यंकटराव शिक्षण संकुलात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
शैक्षणिक

व्यंकटराव शिक्षण संकुलात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा व 'डिजिटल अरेस्ट'बाबत जनजागृती; पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांचा मराठा महासंघातर्फे सत्कार
देश

ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा व 'डिजिटल अरेस्ट'बाबत जनजागृती; पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांचा मराठा महासंघातर्फे सत्कार

ANCHOR AD SLOT