सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीनिमित्त आजरा शैक्षणिक संकुलात भव्य स्वच्छता अभियान

Admin Sarthi Maharashtracha

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीनिमित्त आजरा शैक्षणिक संकुलात भव्य स्वच्छता अभियान
“

अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीनिमित्त आजरा शैक्षणिक संकुलात भव्य स्वच्छता अभियान

आजरा (विशेष प्रतिनिधी)- गोपाळ गडकरी,

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती पंधरवडा व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जनता शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारे भव्य स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले.

​जनता शिक्षण संस्था संचलित आजरा महाविद्यालय, आजरा हायस्कूल, रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर, अण्णाभाऊ इंग्लिश मीडियम स्कूल व आदर्श बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

​अभियानाची सुरुवात जनता शिक्षण संस्थेचे सचिव श्री. रमेशअण्णा कुरुणकर व संचालक श्री. अनिकेतदादा चराटी यांच्या हस्ते स्वच्छता अवजारांचे पूजन करून झाली. याप्रसंगी कनिष्ठ विभागाचे एनएसएस (NSS) प्रकल्प अधिकारी प्रा. रत्नदीप पवार यांनी सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. "स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम न राहता प्रत्येकाच्या दैनंदिन आचरणाचा भाग बनली पाहिजे," असा संदेश यावेळी मान्यवरांनी दिला.

​या मोहिमेअंतर्गत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजरा महाविद्यालय परिसर, आजरा पोलीस ठाणे, एस.टी. डेपो व बस स्थानक, पंचायत समिती परिसर, मोरस्कर महाराज समाधी व घाट परिसर तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराची सखोल स्वच्छता केली. कचरा संकलन व वर्गीकरण करून सार्वजनिक ठिकाणे चकाचक करण्यात आली. गांधीजींच्या स्वच्छतेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देत, विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.

​या अभियानात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण पोतदार, उपप्राचार्य प्रा. डी. पी. संकपाळ, पर्यवेक्षक मनोज पाटील, अधीक्षक श्री. योगेश पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

​आजरा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत या स्तुत्य उपक्रमाचे संयोजन करण्यात आले. शेवटी वरिष्ठ विभागाचे एनएसएस प्रकल्प अधिकारी डॉ. अविनाश वर्धन यांनी उपस्थितांचे आभार मानले. शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेमुळे या उपक्रमाचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.

Admin Sarthi Maharashtracha

Admin Sarthi Maharashtracha

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

रोझरी विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
शैक्षणिक

रोझरी विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

पंडित दीनदयाळ विद्यालयात 'आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन' उत्साहात साजरा
शैक्षणिक

पंडित दीनदयाळ विद्यालयात 'आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन' उत्साहात साजरा

प्रा. मल्लिकार्जून रामाप्पा शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक या प्रतिष्ठेच्या पुरस्कार’साठी निवड
महाराष्ट्र

प्रा. मल्लिकार्जून रामाप्पा शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक या प्रतिष्ठेच्या पुरस्कार’साठी निवड

तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी; लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव
अर्थव्यवस्था

तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी; लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव

ANCHOR AD SLOT