सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी; लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव

Admin Sarthi Maharashtracha

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी; लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव
“

संचालक सुनील चव्हाण सर यांना 'आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार' मिळाल्याबद्दल संस्थेचे सल्लागार शिवाजी मस्कर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पेरणोली : प्रतिनिधी - गोपाळ गडकरी

ग्रामीण भागातील जनतेला भक्कम आर्थिक आधार देणाऱ्या एकता सहकारी गृहतारण संस्था मर्या., पेरणोलीने अवघ्या तीन वर्षांत ४ कोटी ५२ लाख रुपयांच्या ठेवींचा पल्ला गाठत उल्लेखनीय यश मिळवले आहे. आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात अल्पावधीत अशी भरीव कामगिरी करणारी ही पहिलीच संस्था ठरली असून, वाढत्या आर्थिक व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर लवकरच संस्थेचा शाखाविस्तार करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक संतोष जाधव यांनी दिली.

​येथील रवळनाथ मंदिरात संस्थेची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन झाले. संचालक अविनाश जोशिलकर यांनी दिवंगत सभासद व मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्याचा ठराव मांडला.

​संस्थेचे चेअरमन पंकज देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविकातून आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले, "संस्थेकडे सध्या ४ कोटी ५२ लाख रुपयांच्या ठेवी जमा असून ३ कोटी २९ लाख रुपयांचे कर्जवाटप आणि १ कोटी ३२ लाख रुपयांची सुरक्षित गुंतवणूक आहे. संस्थेचा राखीव निधी व वसूल भागभांडवल २० लाख रुपये असून संस्थेने २ लाख २८ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. पहिल्या वर्षापासून सभासदांना सातत्याने ८ टक्के लाभांश देण्यात येत आहे." सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावरच ही प्रगती शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

​संस्थापक संतोष जाधव यांनी ताळेबंद व आर्थिक पत्रकांची माहिती दिली. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम, गतिमान आणि विश्वासार्ह सेवा पुरवण्यासाठी नवीन शाखा सुरू करून कार्यविस्तार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

​याप्रसंगी संस्थेचे संचालक सुनील चव्हाण सर यांना 'आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार' मिळाल्याबद्दल संस्थेचे सल्लागार शिवाजी मस्कर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत यश मिळवलेले सभासद आणि इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी संचालक सुनील चव्हाण, सभासद शिवाजी बिद्रे व पत्रकार रणजीत कालेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

​मॅनेजर राजेंद्र कळेकर यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवला, त्यास सभागृहाने एकमुखाने मंजुरी दिली. त्यानंतर विषयपत्रिकेवरील विषयांवर चर्चा होऊन आवश्यक ते ठराव मंजूर करण्यात आले.

​या सभेस संस्थेचे व्हा. चेअरमन अनिल पारदे, संचालक शेखर कळेकर, कृष्णा सासुलकर, रणजीत फगरे, युवराज कांबळे, संजय गुरव, प्राजक्ता फगरे, सल्लागार मंडळाचे सदस्य तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin Sarthi Maharashtracha

Admin Sarthi Maharashtracha

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

नवीनतम अद्यतन

पंडित दीनदयाळ विद्यालयात 'आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन' उत्साहात साजरा
शैक्षणिक

पंडित दीनदयाळ विद्यालयात 'आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन' उत्साहात साजरा

आजरा साखर कारखान्याची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
महाराष्ट्र

आजरा साखर कारखान्याची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

प्रा. मल्लिकार्जून रामाप्पा शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक या प्रतिष्ठेच्या पुरस्कार’साठी निवड
महाराष्ट्र

प्रा. मल्लिकार्जून रामाप्पा शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक या प्रतिष्ठेच्या पुरस्कार’साठी निवड

दि न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान उत्साहात
शैक्षणिक

दि न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान उत्साहात

ANCHOR AD SLOT