सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात; स्वच्छताविषयक पथनाट्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Admin Sarthi Maharashtracha

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात; स्वच्छताविषयक पथनाट्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
“

आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी.

सिरसंगी (प्रतिनिधी): गोपाळ गडकरी,

स्थानिक आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

​कार्यक्रमाचा प्रारंभ प्रशालेचे मुख्याध्यापक मदन देसाई यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाला. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापक देसाई यांनी महात्मा गांधीजींचे जीवनकार्य, सत्याग्रहाची मूल्ये आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या साध्या राहणीवर प्रकाश टाकला. याप्रसंगी इयत्ता आठवीचा विद्यार्थी आदित्य अशोक कुंभार याने महात्मा गांधींची हुबेहूब वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

​जयंतीचे औचित्य साधून गावातून भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात स्वच्छतेचे संदेश देणारे फलक घेऊन घोषणाबाजी करत नागरिकांमध्ये जनजागृती केली. प्रभातफेरीदरम्यान गावातील मुख्य बसस्थानकावर इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे प्रभावी पथनाट्य सादर केले. या पथनाट्याला सौ. मेघा चव्हाण व कु. श्रुती वांजोळे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या सादरीकरणाचे उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून कौतुक केले.

​या सोहळ्यास विठ्ठल चौगुले, आनंदा प्रभू, दिलीप देसाई, संतराम केसरकर, पोलीस पाटील दत्तात्रय गुरव, उपसरपंच पांडुरंग टकेकर, एकनाथ मातवणकर, अनिल परीट, गणू कसेकर, सुरेश येलगार, पांडुरंग होडगे यांच्यासह परिसरातील नागरिक, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin Sarthi Maharashtracha

Admin Sarthi Maharashtracha

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

वन्यजीव सप्ताहानिमित्त तुर्केवाडी आयटीआयमध्ये निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

वन्यजीव सप्ताहानिमित्त तुर्केवाडी आयटीआयमध्ये निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न

अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीनिमित्त आजरा शैक्षणिक संकुलात भव्य स्वच्छता अभियान
शैक्षणिक

अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीनिमित्त आजरा शैक्षणिक संकुलात भव्य स्वच्छता अभियान

रोझरी विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
शैक्षणिक

रोझरी विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

व्यंकटराव शिक्षण संकुलात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
शैक्षणिक

व्यंकटराव शिक्षण संकुलात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

ANCHOR AD SLOT