सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

आदर्श हायस्कूल शिरसंगी येथे ‘वन ज्ञान स्पर्धा’ उत्साहात संपन्न

Admin Sarthi Maharashtracha

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आदर्श हायस्कूल शिरसंगी येथे ‘वन ज्ञान स्पर्धा’ उत्साहात संपन्न
“

प्रथम: साईराज विष्णू देसाई

शिरसंगी (ता. आजरा):

येथील आदर्श हायस्कूलमध्ये सामाजिक वनीकरण विभाग चंदगड यांच्या वतीने वनविषयक माहितीवर आधारित 'वन ज्ञान स्पर्धा' उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांना वन, वन्यजीव व पर्यावरण यांविषयी सामान्य ज्ञान मिळावे तसेच भावी आयुष्यातील स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी व्हावी, या हेतूने वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांच्या संकल्पनेतून ही परीक्षा घेण्यात आली. विशेष म्हणजे, या परीक्षेतील उत्तरपत्रिकांची तपासणी व गुणानुक्रम काढण्याचे काम खुद्द विद्यार्थ्यांनीच केले.

​स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे:

​प्रथम: साईराज विष्णू देसाई

​द्वितीय: विशाल विजय वांजोळे

​तृतीय: संभव चाळु चौगले

​चतुर्थ: अथर्व आनंदा कांबळे

​पाचवी: वैदवी तुकाराम बुरुड

​सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, वही आणि पेन देऊन वनक्षेत्रपाल दत्ता पाटील व मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

​याप्रसंगी वनक्षेत्रपाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग, संस्कृती आणि विद्यार्थ्यांची पर्यावरणाप्रती जबाबदारी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. वन विभागातील रंजक अनुभव सांगून त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोरंजनही केले. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उज्ज्वल यशाबद्दल क्रीडा शिक्षक आनंद प्रभू यांचा वनक्षेत्रपाल पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक मदन देसाई यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षक विठ्ठल चौगले यांनी केले, तर सहायक शिक्षिका मेघा जाधव यांनी आभार मानले.

​या उपक्रमास वन विभागाचे कर्मचारी, प्रशालेचे कर्मचारी दिलीप देसाई तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Admin Sarthi Maharashtracha

Admin Sarthi Maharashtracha

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

रोझरी विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
शैक्षणिक

रोझरी विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

वन्यजीव सप्ताहानिमित्त तुर्केवाडी आयटीआयमध्ये निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

वन्यजीव सप्ताहानिमित्त तुर्केवाडी आयटीआयमध्ये निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न

व्यंकटराव शिक्षण संकुलात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
शैक्षणिक

व्यंकटराव शिक्षण संकुलात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

सांप्रदाय भारती श्री कृष्णकांत स्वामी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस उत्साहात; श्रीक्षेत्र शेळप येथे संपन्न झाला सत्कार सोहळा
महाराष्ट्र

सांप्रदाय भारती श्री कृष्णकांत स्वामी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस उत्साहात; श्रीक्षेत्र शेळप येथे संपन्न झाला सत्कार सोहळा

ANCHOR AD SLOT