सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

आजरा महाविद्यालयात ‘नॅक रीफॉर्म- २०२४’ विषयावर कार्यशाळा संपन्न

Admin Sarthi Maharashtracha

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आजरा महाविद्यालयात ‘नॅक रीफॉर्म- २०२४’ विषयावर कार्यशाळा संपन्न
“

नॅकच्या नवीन सुधारित मूल्यांकन पद्धती व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर सखोल मार्गदर्शन

आजरा: प्रतिनिधी,

येथील आजरा महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (IQAC) वतीने ‘नॅक रीफॉर्म- २०२४’ या विषयावर नुकतीच एकदिवसीय विशेष कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. नॅक मूल्यांकनाची नवीन सुधारित कार्यपद्धती, गुणवत्ता निकष आणि मानांकन प्रक्रियेतील बदलांविषयी प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती व्हावी, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

​कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून दि न्यू कॉलेज, कोल्हापूरचे नॅक समन्वयक प्रा. डॉ. निलेश पवार उपस्थित होते. त्यांनी नॅक रीफॉर्म- २०२४ अंतर्गत झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांवर प्रकाश टाकत सुधारित दहा विभाग, नवीन गुणदान पद्धती, आवश्यक कागदपत्रे, अचूक डेटा संकलन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी उपयोग आणि सादरीकरणाच्या पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. "नॅक मानांकन ही केवळ गुणांकनाची प्रक्रिया नसून महाविद्यालयातील शैक्षणिक व प्रशासकीय गुणवत्ता सातत्याने उंचावण्याची संधी आहे," असे नमूद करत त्यांनी महाविद्यालयातील प्रत्येक उपक्रमाचा अहवाल व व्हिडिओ अधिकृत संकेतस्थळावर वेळेत अपलोड करण्याचे आवाहन केले. उपस्थित प्राध्यापकांनी विविध प्रश्न विचारून चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. के. जी. पोतदार म्हणाले, "नॅकच्या नवीन कार्यपद्धतीनुसार प्राध्यापकांनी आतापासूनच पद्धतशीर तयारी सुरू करावी. या कार्यशाळेमुळे मिळालेल्या मार्गदर्शनाचा आगामी नॅक प्रक्रियेत महाविद्यालयाला नक्कीच मोठा फायदा होईल."

​कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. आर. एस. कर्पे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. बी. एम. मोहिते यांनी करून दिला. प्रा. डॉ. एम. आर. ठोंबरे यांनी आभार मानले. कार्यशाळेसाठी तांत्रिक साहाय्य प्रा. एस. के. जाधव व डॉ. एस. पी. गजरे यांनी केले.

​या कार्यशाळेस कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, समन्वयक प्रा. एस. बी. सावंत यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व प्रशासकीय वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाच्या आयक्यूएसी (IQAC) विभागाचे कौतुक होत आहे.

Admin Sarthi Maharashtracha

Admin Sarthi Maharashtracha

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

भाजप कोल्हापूर (ग्रामीण) सोशल मीडिया सेलच्या सह संयोजकपदी हर्षद परुळेकर (आजरा) यांची निवड
महाराष्ट्र

भाजप कोल्हापूर (ग्रामीण) सोशल मीडिया सेलच्या सह संयोजकपदी हर्षद परुळेकर (आजरा) यांची निवड

सांप्रदाय भारती श्री कृष्णकांत स्वामी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस उत्साहात; श्रीक्षेत्र शेळप येथे संपन्न झाला सत्कार सोहळा
महाराष्ट्र

सांप्रदाय भारती श्री कृष्णकांत स्वामी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस उत्साहात; श्रीक्षेत्र शेळप येथे संपन्न झाला सत्कार सोहळा

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात; स्वच्छताविषयक पथनाट्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात; स्वच्छताविषयक पथनाट्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आजरा महाविद्यालयात अण्णा भाऊ स्मृती पंधरवड्यानिमित्त तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न*
महाराष्ट्र

आजरा महाविद्यालयात अण्णा भाऊ स्मृती पंधरवड्यानिमित्त तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न*

ANCHOR AD SLOT