सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

धनंजय विद्यालय नागणवाडी येथे ‘वन ज्ञान’ स्पर्धेने वन्यजीव सप्ताहाची सांगता; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Admin Sarthi Maharashtracha

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

धनंजय विद्यालय नागणवाडी येथे ‘वन ज्ञान’ स्पर्धेने वन्यजीव सप्ताहाची सांगता; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
“

वनपरिक्षेत्र चंदगड यांच्या वतीने आयोजित 'वन्यजीव सप्ताह २०२६' ची सांगता

नागणवाडी (चंदगड): प्रतिनिधी,

सामाजिक वनीकरण विभाग कोल्हापूर अंतर्गत वनपरिक्षेत्र चंदगड यांच्या वतीने आयोजित 'वन्यजीव सप्ताह २०२६' ची सांगता धनंजय विद्यालय नागणवाडी येथे उत्साहात पार पडली. या सांगता समारंभाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या 'वन ज्ञान' स्पर्धेत ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून पर्यावरण ज्ञानाची चुणूक दाखवली.

​या स्पर्धेत संस्कृती मोरे हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर अनुष्का नेवगे (द्वितीय), शौर्य दोरुगडे (तृतीय), ऋतिका वाके (चौथा) आणि राजवीर मगदूम (पाचवा) यांनी अनुक्रमे यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वनक्षेत्रपाल दत्ता पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि शालेय साहित्याचे वाटप करून गौरविण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटपही करण्यात आले.

​याप्रसंगी मार्गदर्शन करताना वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी निसर्ग, पर्यावरण, वने व वन्यजीवांचे रक्षण याविषयी विद्यार्थ्यांचे कर्तव्य, संस्कार आणि संस्कृती यावर प्रेरणादायी विचार मांडले. वनपाल सौ. माणिक खोत यांनी विद्यार्थिनींना वनसेवेतील करिअरच्या विविध संधींविषयी सविस्तर माहिती दिली.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य एस. एम. पाटील होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन एच. आर. पावसकर यांनी केले, तर आभार एस. जे. पाटील यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सागर बांदिवडेकर यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे या उपक्रमास मोलाचे सहकार्य लाभले.

​यावेळी वनपाल सलीम मुल्ला, वनरक्षक जालिंदर गावडे, अरुण सांगळे, वनसेवक पांडुरंग खापरे, रवी पाटील आणि श्रीकांत तराळ उपस्थित होते.

​तालुक्यात विविध उपक्रमांची रेलचेल

ऑक्टोबरचा पहिला आठवडा जागतिक वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने कोल्हापूरचे विभागीय वनाधिकारी किशोरकुमार येळे व सहायक वनसंरक्षक स्नेहल मगर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चंदगडचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांच्या संकल्पनेतून चंदगड व आजरा तालुक्यांतील विविध शाळांमध्ये प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये चित्रकला, निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य आणि वन ज्ञान स्पर्धांचा समावेश होता. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून शैक्षणिक व सामाजिक स्तरावरून वन विभागाच्या या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.

Admin Sarthi Maharashtracha

Admin Sarthi Maharashtracha

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे हिरक महोत्सवाचा भव्य व दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न
देश

रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे हिरक महोत्सवाचा भव्य व दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न

आजऱ्याच्या व्यंकटराव हायस्कूलमध्ये 'हादगा बोळवण' समारंभ उत्साहात; साडेचारशे विद्यार्थिनींचा सहभाग
महाराष्ट्र

आजऱ्याच्या व्यंकटराव हायस्कूलमध्ये 'हादगा बोळवण' समारंभ उत्साहात; साडेचारशे विद्यार्थिनींचा सहभाग

रोझरी विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
शैक्षणिक

रोझरी विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

आजऱ्यात अमृत जल योजनेवरून १३ नगरसेवक आक्रमक; पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत ठेकेदाराची देयके रोखण्याची मागणी
महाराष्ट्र

आजऱ्यात अमृत जल योजनेवरून १३ नगरसेवक आक्रमक; पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत ठेकेदाराची देयके रोखण्याची मागणी

ANCHOR AD SLOT