सारथी महाराष्ट्राचा ई-पेपर
शैक्षणिक

रोझरी विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

Admin Sarthi Maharashtracha • 02 October 2026, 04:13 AM

आजरा -प्रतिनिधी,

स्थानिक रोझरी विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात व आदरपूर्वक साजरी करण्यात आली.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनवेल बार्देसकर, पर्यवेक्षक श्री. विजय केसरकर आणि ज्येष्ठ शिक्षक श्री. डॉमिनिक डिसोझा यांच्या शुभहस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या दोन्ही थोर महापुरुषांना मनोभावे अभिवादन केले.

​कार्यक्रमात इयत्ता सहावीची विद्यार्थिनी सायमा दरवाजकर हिने आपल्या मनोगतातून महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रेरक जीवनपटाचा परिचय उपस्थितांना करून दिला. शिक्षक श्री. स्टीफन डिसोझा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "या दोन्ही महापुरुषांच्या महान विचारांचा आपल्या जीवनात प्रत्यक्ष अवलंब करणे आवश्यक आहे. त्यांच्या सत्य, अहिंसा, साधेपणा आणि प्रामाणिकपणा या मूल्यांचे जीवनात आचरण करणे हेच त्यांना खरेखुरे अभिवादन ठरेल."

​कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन संयोजिका सौ. प्रणिता होडगे यांनी केले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिसादात हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)