सारथी महाराष्ट्राचा ई-पेपर
महाराष्ट्र

गोकुळ' निवडणुकीसाठी महायुतीच्या ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ची उमेदवारी यादी जाहीर; दिग्गज नेत्यांना संधी

Admin Sarthi Maharashtracha • 08 October 2026, 09:42 AM

कोल्हापूर:

जिल्ह्याचे आर्थिक सत्ताकेंद्र आणि सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीने ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’च्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट) आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या अनुभवी तसेच मातब्बर चेहऱ्यांना संधी देत समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

​पक्षनिहाय जाहीर झालेले उमेदवार खालीलप्रमाणे:

​राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)

​श्री. राजेश नरसिंगराव पाटील (माजी आमदार) – चंदगड

​श्री. अरुणराव गणपतराव डोंगळे – राधानगरी

​श्री. राहुल पांडुरंग (पी. एन.) पाटील – करवीर

​श्री. रणजित कृष्णराव (के. पी.) पाटील – भुदरगड

​श्री. युवराज दत्ताजीराव पाटील – कागल

​श्री. सतीश भीमगोंडा पाटील – गडहिंग्लज

​श्री. नवीद हसनसाहेब मुश्रीफ – कागल

​सौ. अर्चना आनंदराव (ए. वाय.) पाटील – राधानगरी

​श्री. रणजीत दिलीप पाटील – शिरोळ

​भारतीय जनता पार्टी (भाजप)

​सौ. शौमिका अमल महाडिक – शिरोली

​श्री. अंबरीशसिंह संजय घाटगे – कागल

​श्री. चेतन अरुण नरके – पन्हाळा

​श्री. दीपक भरमू पाटील – चंदगड

​श्री. अशोक काशिनाथ चराटी – आजरा

​श्री. प्रतापसिंह शंकरराव पाटील – करवीर

​श्री. विश्वास शंकर जाधव – पन्हाळा

​शिवसेना (शिंदे गट)

​श्री. विश्वास नारायण पाटील (आबाजी) – करवीर

​श्री. अजित शशिकांत नरके – पन्हाळा

​श्री. संभाजी रंगराव पाटील – करवीर

​श्री. अजित पांडुरंग पाटील – करवीर

​ॲड. वीरेंद्र संजय मंडलिक – कागल

​श्री. मदन बाबुराव देसाई – भुदरगड

​डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर – हातकणंगले

​जन सुराज्य शक्ती पक्ष

​श्री. कर्णसिंह संजयसिंह गायकवाड – शाहूवाडी

​श्री. अमरसिंह यशवंत पाटील – पन्हाळा

​जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना योग्य प्रतिनिधित्व देत महायुतीने तगडी फळी मैदानात उतरवली असून, उमेदवारांची नावे निश्चित झाल्याने गोकुळच्या रणधुमाळीत मोठी रंगत निर्माण झाली आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)